साहित्य : 1 कप तांदूळ, 1 कप तूर, 1 कप उडीद आणि 1 कप चण्याची डाळ, 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, 2 कांदे बारीक चिरलेले, 1/2 चमचा तिखट, मीठ चवीनुसार, चिमूट भर हिंग.
कृती : तांदूळ व डाळींना वेग वेगळ्या 3-4 तास पाण्यात भिजत ठेवावे. नंतर तांदूळ व डाळींना वेग वेगळे वाटून घ्यावे. सर्व साहित्य एकजीव करावे व त्यात बाकीचे साहित्य घालून 1/2 तास तसेच ठेवावे. नॉनस्टिक पॅनमध्ये लहान लहान डोसे तयार करावे व नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.