साहित्य : 1-1 कप धुतलेली मूग व मसूर डाळ, 3 चमचे गाजराचा कीस, 1 चमचे बारीक चिरलेले कांदे, आलं-लसणाची पेस्ट 1 चमचा, 1/2 चमचा हळद, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 8-10 पुदिनाचे पानं, धने, जिरे व शोपची पूड 1-1 चमचा, तिखट चवीनुसार, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा लिंबाचा रस.
कृती : दोन्ही डाळींना 5-6 तास भिजत घालाव्या नंतर त्यातील पाणी काढून हिरव्या मिरच्या घालून त्याची पेस्ट करून घ्यावी. ह्या पेस्टमध्ये 1 कप पाणी टाकावे. नॉनस्टिक कढईत हळद, डाळींची पेस्ट, मीठ व तिखट टाकून घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यात आलं-लसूण पेस्ट घालावे, मिश्रणाचा गोळा होऊ लागेल तेव्हा त्यात बारीक चिरलेला कांदा, गाजराचा कीस, पुदिना घालून 4-5 मिनिट चांगले परतावे, व एका ताटात हे मिश्रण थंड होईस्तोर जमवून घ्यावे नंतर त्याच्या वड्या कापाव्यात, जेव्हा खाण्यात घ्यायच्या असतील तेव्हा कढई गरम करून त्यात वड्या, सुखे मसाले, लिंबाचा रस आणि दोन चमचे पाणी टाकून 2 मिनिट चांगले परतून घ्यावे. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. या वड्यांबरोबर कोथिंबीर, पुदिन्याची चटणी रुचकर लागते.