कृती : सर्वप्रथम ताकात बेसन, मीठ, तिखट, हळद आणि दीड कप पाणी घालून त्याचा घोळ तयार करावा. तूप गरम करून त्यात मोहरी, हिंग, साबूत लाल मिरच्या व कढी पत्त्यांची फोडणी द्यावी. आता मुगवडी घालून चांगले परतून घ्यावे. नंतर ताक-बेसनाचा घोळ, हिरव्या मिरच्या घालून चांगले हालवावे. एक उकळी आल्यावर मंद आच करून 10-15 मिनिट शिजवावे. सर्वात शेवटी कोथिंबीर, घालून गरमा गरम सर्व्ह करारी.