साहित्य : मुगाची पाव वाटी डाळ पाण्यात २ तास भिजवा. एक वाटी तांदूळ एक तास पाण्यात भिजवून ठेवा. एक वाटी किसलेला गूळ, दोन वाट्या दूध, दोन चमचे किसलेले खोबरे, दोन वाटी कढतं पाणी, चार चमचे देसी तूप, एक लवंग, एक मसाला वेलची, एक काडी दालचिनी, वेलची पूड, केसर, काजू, बेदाणे हे सर्व दूधात मूरवून ठेवा.
मुगाची खीर बनविण्यासाठी आधी मूगाचे आणि तांदळाचे दोन्हीचे पाणी चांगले चाळणीत निथळून घ्या. पातेल्यात दोन चमचे तूप घालून त्यात लवंग, थोडे केसर आणि मसाला वेलची घालून त्यात मूग आणि तांदूळ घाला. दोन मिनिटे परतून झाले की त्यात कढत पाणी घाला. परंतु त्याआधी मसाला वेलची आणि दालचीनी काढून टाकायला विसरू नका. भात आणि मूग भिजवत ठेवल्याने ते लवकर शिजतात. आता घोट्याने हे सगळे घोटत राहून सर्व एकजीव लगदा करा. त्यात गूळ टाकून परत घोटतच राहा. उरलेले तूप हळूहळू सोडा. नंतर त्यात दूध टाका. मग पुन्हा घोटून वेलची पूड, फुगलेले बेदाणे, उरलेले केशर, काजू, खोबरे टाकून खीर पाहिजे तेवढी घट्ट वा पातळ करा.