Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुगाच्या डाळीचा डोसा

मुगाच्या डाळीचा डोसा
साहित्य : दोन वाट्या मुगाची डाळ, चार-पाच ओल्या मिरच्या, आले, हवी असल्यास लसूण, मीठ, पाव चमचा हळद.

कृती: डोसा करण्यापूर्वी चार-पाच तास आधी मुगाची डाळ भिजत घालावी. भिजल्यानंतर ही वाटून घ्यावी. डाळ वाटून होत आल्यावर त्यातच मिरच्या, मीठ, आले व आवडत असल्यास लसूण घालून सर्व पूर्णपणे वाटून घ्यावे. डोसा करण्याच्या वेळी पिठात थोडी हळद टाकावी. विडाचा तवा तापत ठेवून, त्यावर चमचाभर तेल घालून, त्यावर तयार केलेले पीठ सारखे पळीभर घालावे व पातळ पसरून त्यावर झाकण ठेवावे. डोसा तयार झाल्यावर काढून घ्यावा व चटणीसोबत खावयास द्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi