साहित्य : 4 वाट्या तांदूळ, 1 वाटी उदीड डाळ, 1/2 वाटी खोवलेले खोबरे, 1 चमचा हिंग, 2 चमचे मीठ, तळण्यास तेल.
कृती : तांदूळ चार तास भिजत घालावे व नंतर रोवळीत उपसावे. थोडे कोरडे झाल्यवर बारीक करून चाळून घ्यावे. उडदाची डळ बदामी रंगावर भाजून दळून आणावी. दोन्ही पिठे एकत्र करून त्यात मीठ, हिंग, खोबर्याचे घट्ट दूध घालून पाण्याने पीठ भिजवावे. या पिठाचा बेताचा गोळा डाव्या हाता ठेवून बोटातून दाबून त्याला पीळ घालावा. कागदावर चकली घालावी व तेलात गुलाबी रंगावर तळावी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा