साहित्य : एक वाटी चण्याची डाळ किंवा एक वाटी डाळे, एक वाटी सुक्या मिरच्या (डेख काढून), कढीलिंब, मीठ, हिंग, पाव वाटी तीळ
कृती : हे सर्व जिन्नस तांबूस भाजून, जाडसर कुटावेत व ही चटणीपूड बरणीत भरून ठेवावी.
ही चटणी तेलात पातळसर कालवून इडली, वडे व डोसा यांच्याबरोबर देतात. ही चटणी जास्त तिखट पाहिजे असल्यास एक वाटीपेक्षा जास्त सुक्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे घ्याव्यात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा