साहित्य : 2 वाट्या उडदाची डाळ, चवीपुरते मीठ, तेल.
कृती : वडे करण्यापूर्वी पाच-सहा तास उडदाची डाळ भिजत घालावी. भिजून झाल्यावर किंचित जाडसर वाटावी. वाटताना फार पाणी घालू नये. नंतर त्यात चवीला मीठ घालून सारखे करून घ्यावे. नंतर ते पीठ पानावर जरा जाडच थापून, त्यात मधोमध भोक पाडून, चांगले तांबूस रंगावर वडे तळून काढावेत.