साहित्य : एक वाटी धने, अर्धी वाटी तुरीची डाळ, पाव वाटी जिरे, पाव वाटी मिरे, चार हळकुंडे, सुपारीएवढा हिंग. हे सर्व जिन्नस किंचित गरम करून, कुटून, मसाला तयार करून ठेवावा.
रसम तयार करण्याची कृती : अर्धा लीटर पाणी घेऊन, त्यात दोन चमचे रसम्चा वरील मसाला, चवीपुरते मीठ व कढीलिंबाची पाने घालनू पाणी उकळावे. नंतर लिंबाएवढी चिंच कोळून ते पाणी घालावे. तसेच तीन-चार टोमॅटो उकडून घेऊन व कुस्करून घेऊन त्यांचा रस गाळून घेऊन घालावा. उकळल्यावर त्यात कोथिंबीर घालावी.