साहित्य : 3 कप पाणी, 2 कप तांदूळ धुतलेला, 1/2 चमचा हळद पूड, 1/4 चमचा तेल, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा चणा डाळ, 1/2 चमचा उडीद डाळ, 1 काडी कढी पत्ता, 8 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, मीठ चवीप्रमाणे, 1 चमचा लिंबाचा रस.
कृती : कुकरमध्ये पाणी तांदूळ व हळद पूड घालून ढवळून घ्या व 2 मिनिटे शिजवा. नंतर कुकर थंड झाल्यावर भात मोकळा करा. एका लहान कढईत तेल टाकून मोहरीची फोडणी द्या, त्यात चणा डाळ, उडीद डाळ घाला व बदामी होईपर्यंत परता. कढी पत्ता आणि मिरच्या घाला. काही सेकंद ढवळा. कढई आचेवरून काढा आणि भातावर ओता. लिंबू रसात मीठ घाला आणि तो भातावर घाला. चांगले मिसळा. गरम गरम वाढा.