साहित्य - 10-12 शेवग्याच्या शेंगा दळदार हव्यात, आले लसूण पेस्ट प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा, धने पूड 1 चमचा, जिरेपूड अर्धा लहान चमचा, काळा मसाला अर्धा चमचा, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, पाव वाटी टोमॅटो चिरून, कोथिंबीर पाव वाटी, चवीनुसार तिखट, मीठ, हळद पाव चमचा फोडणीसाठी तेल, जिरं, मोहरी, हिंग.
कृती : शेंगा सोलून तुकडे करावेत व धुवून घ्याव्यात. थोड्या पाण्यात मीठ घालून 10 मिनिटे शेंगा उकळाव्यात. मऊ शिजू द्याव्यात. शेंगा पाण्यातून काढून निथळायला ठेवाव्यात. पाणी वरणात वापरावे. निथळलेल्या शेंगाचा जमच्याने गर काढून घ्यावा.
गरम कढईत तेल जिर, मोहरी हिंग, कढिपत्याची फोडणी करावी, कांदा घाला, परतून घ्या, टोमॅटोच्या फोडी घाला, परता, आले लसूण पेस्ट धने जिरेपूड घाला, हलवा. काळा मसाला, चवीनुसार तिखट मीठ हळद घाला. चांगले हलवा. शेंगाचा गर घाला चांगले हलवा. कोथिंबीर घाला हलवा चांगली वाफ येऊ द्या. हे भरीत भाकरीसोबत वाढा.