Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सांबार (तूर डाळ आणि भाज्यांचे सार)

सांबार (तूर डाळ आणि भाज्यांचे सार)
साहित्य : 1/2 चमचा चणा डाळ, 3/4 मोठा चमचा तेल, 5 अख्ख्या सुक्या लाल मिरच्या, हिंग, 1/4 नारळ खवलेलं, 1 काडी कढीपत्ता,
2 चमचे धणे, 1/4 चमचा जिरे, मेथी, 3 कप पाणी, 1/2 कप तूर डाळ धुतलेली, 1/4 चमचा हळद, 2 छोटे चमचे मीठ, 15 ग्रॅम चिंच 1/2
कप गरम पाण्यात 15 मिनिटे भिजवून लगदा काढलेली, 1 लहान कांदा चिरलेला, 1 शेवग्याची शेंग तुकडे केलेले.

फोडणी : 1 मोठा चमचा तेल, 1/4 चमचा मोहरी.

ND
कृती : सर्वप्रथम तव्यात तेल गरम करून त्यात आख्ख्या मिरच्या, चणा डाळ, हिंग, नारळ, कढीपत्ता, धणे, जिरे, आणि मेथी व नारळ बदामी होईपर्यंत भाजा व थोडेसे पाणी घालून त्याची पेस्ट करा. कुकरामध्ये दीड कप पाणी घालून तुरडाळ, हळद पूड आणि मीठ घाला. एकदा ढवळून 3 मिनिटे शिजवा. नंतर थंड झाल्यावर शिजलेली डाळ एकजीव करून त्यात पेस्ट, चिंच, कांदा, शेवग्याच्या शेंगा, कढीपत्ता आणि पाणी घालून 1 मिनिट शिजवा.

फोडणीसाठी छोट्या कढईमध्ये तेल गरम करून राई घाला. तडतडताच सांबारामध्ये ओता. ढवळा आणि गरम गरम वाढा.

Share this Story:

Follow Webdunia marathi