साहित्य : 100 ग्रॅम शिंगाड्याचे पीठ,100 ग्रॅम राजगिऱ्याचे पीठ,1 मोठा बटाटा उकडलेला, शेंदे मीठ, काळे मीठ, जिरे पूड, कोथिंबीर, 250 ग्रॅम दही,1 चमचा साखर आणि चिंचेची चटणी, तळण्यासाठी तेल.
कृती : सर्वप्रथम शिंगाडा आणि राजगिऱ्याच्या पिठाला चाळून त्यात उकडलेला बटाटा घालून पीठ मळून घ्यावे. आता या गोळ्याचे वडे तळून घ्या. नंतर दह्यात साखर घालून चांगले एकजीव करावे. एका प्लेटमध्ये वडे, वरून दही, चिंचेची चटणी, जीर, कोथिंबीरिने सजवून सर्व्ह करावे.