साहित्य : 1/2 किलो तांदुळाची पिठी, 1 लहान चमचा वेलची पूड, 1 लहान चमचा तीळ, 300 ग्रॅम गूळ, 1/4 कप पाणी, 1 मोठा चमचा तूप, तळण्यासाठी तेल.
कृती : सर्वप्रथम गुळाला किसून एका कढईत पाणी घालून विरघळून घ्यावे व या पाण्याला कपड्याने गाळून घ्यावे. नंतर या गुळाच्या पाण्याला परत कढईत घालून दोन तारी पाक तयार करावा व कढईला खाली उतरवून घ्यावे. नंतर त्यात वेलची पूड आणि तांदुळाची पिठी घालावी. या मिश्रणाला कणकेच्या गोळ्या प्रमाणे लहान लहान गोळे तयार करून सोनेरी रंग येईपर्यंत तळावे.