Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चेन्नईत जिंकण्याच्या ईर्षेचा विजय

चेन्नईत जिंकण्याच्या ईर्षेचा विजय

मनोज पोलादे

शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स ने २०५ धावांचे लक्ष गाठत बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स वर सनसनाटी विजय नोंदवला. शेवटच्या दोन षट्कात चेन्नईने तब्बल ४५ धावा तडकावत अविश्वसनिय विजय साकार केला. ४६ चेंडूत ७१ धावांची दमदार खेळी करणारा फाफ डू प्लेसीस सामनावीर ठरला.

PR
PR
शेवटच्या दोन षट्कात चेन्नईस विजयासाठी ४३ धावांची आवश्यकता होती. विराट कोहलीने टाकलेल्या १९ व्या षट्कात एल्बी मॉर्केल ने २८ धावा तडकावत 'अशक्य' लक्ष 'शक्य' असल्याचा विश्वास संघात भरला. या विश्वासानेच चेन्नईच्या विजयात प्रमुख भूमिका साकारली. २० वे षट्क विनय कुमारने टाकले. ब्राव्हो व जडेजाने यामध्ये १७ धावा करत आयपीएलमधील दुसरे सर्वात मोठे लक्ष लिलया गाठले. शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना विनय कुमारचा 'यॉर्कर' चूकला आणि जडेजाने मारलेल्या फटक्याने सीमारेषा गाठली.

चेन्नईत झालेल्या या सामन्यात ४१३ धावांचा पाऊस पडला. चेन्नई सुपर किंग्स साठी हे घरचे मैदान असल्याने त्यांना मानसिकरित्या पाठिंबा मिळाला. बेंगळूरूने चेन्नईसमोर ठेवलेले लक्ष गाठताना चेन्नई अडखळत लक्षाचा पाठलाग करत राहिली, यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत विजयाचे पारडे एकमेंकांकडे झुकत राहिले. प्रेक्षकांनी ही लढत मनापासून एन्जॉय केली. यंदाच्या मोसमातील हा सर्वात रोमहर्षक सामना ठरला.

चेन्नई संघ बेंगळुरूच्या तुलनेत कागदावर भक्कम वाटत नसला तरी या संघात मोक्याच्या क्षणी दमदार खेळी करणारे धोनी, मॉर्केल, सुरेश रैना, फाफ डू प्लेसीस यांसारखे जीगरबाज खेळाडू आहेत. या संघात कर्णधार धोनीने चीवटपणा ठासून भरला आहे. शेवटपर्यंत झुंजण्याची ईर्षा पेटत राहिल, हा व्यावसायिकपणा चेन्नई संघाने जोपासला आहे. आज अखेर ती 'ज‍ीगर'च जिंकली.

याअगोदर वनडे क्रिकेटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेने ४३४ धावांचे लक्ष गाठत ऑस्ट्रेलियासोबत जगभरातील क्रिकेट रसीकांना चकित केले होते. तेव्हाही ‍'अशक्य' हे 'शक्य' करून दाखवण्याच्या ईर्षेने पेटलेल्या खेळाडूंच्या चीवट झुंजीनेच सर्वांना आश्चर्यचकित करून तोंडात बोट घालण्यास भाग पाडले होते.

चेन्नईतलल्या चिदंबरम स्टेडियमवरही आज त्याचीच पुनरावृत्ती झाली आणि क्रिकेट खरोखरीच 'अनिश्चितते'चा खेळ असल्याचे परत एकदा सिद्ध झाले!

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi