Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महागडी घड्याळ घालतात भारताचे क्रिकेटर

महागडी घड्याळ घालतात भारताचे क्रिकेटर
अनेकांना घड्याळाचा खूप छंद असतो. वेगवेगळ्या प्रकारची ब्रॅन्डेड घड्याळ ही अनेकांना घालायला आवडतात मग यामध्ये क्रिकेटरही मागे नाहीत. क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही अनेक खेळाडूंना घड्याळ घालून खेळताना पाहिलं असेल. पण त्यांची किंमत एवढी आहे की तुम्हालादेखील आश्चर्य वाटेल. पाहा किती आहे क्रिकेट खेळाडूंच्या घड्याळांची किंमत.


विराट कोहली : विराट कोहली Panerai Luminor 1950 GMT 3 Days Automatic Acciaio घड्याळ घालतो. विराट जेव्हा कपिल शर्माच्या कॉमेडी नाइट विथ कपिल शो मध्ये आला होता तेव्हा त्याच्या हातात हे घड्याळ दिसलं होतं याची किंमत आहे 6 लाख 29 हजार रुपये. हे घड्याळ 44 एमएमचं आहे.

उमेश यादव : भारतीय टीमचा Graham Silverstone Stowe GMT घड्याळ वापरतो. याची किंमत 6 लाख 73 हजार रुपये आहे.
webdunia

महेंद्रसिंग धोनी : भारतीय टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी Audemars Piguet Royal Oak Offshore Bumble Bee घड्याळ वापरतो. या घड्याळाची किंमत 26 लाख 78 हजार रुपये आहे.
webdunia

सचिन तेंडुलकर : भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर या सगळ्या खेळाडूंच्या बाबतीत खूपच पुढे आहे पण तो घड्याळांच्या बाबतीतही सगळ्यांच्या पुढे आहे. सचिन Audemars Piguet Carbon Concept Tourbillon या कंपनीचं घड्याळ वापरतो. याची किंमत तब्बल 1.3 कोटी आहे.
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झाडांसमवेत सेल्फी घ्या: मुख्यमंत्र्यांचा आदेश