Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अँडी रॉडिककडून रॉजर फेडररचा पराभव

अँडी रॉडिककडून रॉजर फेडररचा पराभव

वेबदुनिया

, मंगळवार, 27 मार्च 2012 (14:11 IST)
WD
सोनी एरिक्सन ओपन टेनिस स्पर्धेत अमेरिकेचा टेनिसपटू अँडी रॉडिकने स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररचा पराभव केला. या दोघांमध्ये आतापर्यंत झालेल्या २४ सामन्यात रॉडिकने फेडररचा केलेला हा तिसरा पराभव आहे.

या स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत हे दोघे समोरासमोर आले होते. रॉडिकने फेडररचा ७-६, १-६, ६-४ असा पराभव केला. आपल्या ताकदवान फटक्यांमुळे प्रसिद्ध असलेल्या रॉडिकने तिसऱ्या सेटमध्ये झुंजार खेळ करीत विजय मिळविला.

अँडी रॉ़डिक हा सध्या जागतिक क्रमवारीत ३४ व्या स्थानावर आहे. तर रॉजर फेडरर तिसऱ्या स्थानावर आहे. पराभवानंतर फेडररने रॉडिकने चांगला खेळ केल्याचे सांगत, तो उत्तम खेळाडू असल्याचे सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi