Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमीर, सलमानमुळे कुस्तीला मिळणार नवी ओळख: बहल

आमीर, सलमानमुळे कुस्तीला मिळणार नवी ओळख: बहल
मुंबई- अभिनेता आमीर खान आणि सलमान खान यांच्या आगामी चित्रपटांमुळे विस्मरणात गेलेल्या कुस्ती या क्रीडाप्रकाराला नवी ओळख मिळेल, असे मत निर्माता-दिग्दर्शक गोल्डी बहल यांनी व्यक्त केले आहे. सलमान आणि आमीर त्यांच्या आगामी ‘सुल्तान’ आणि ‘दंगल’ या चित्रपटात मल्लाची भूमिका साकारणार आहेत.
 
गोल्डी म्हणाले की, आमीर आणि सलमान दोघेही आघाडीचे अभिनेते आहेत. ते कुस्ती या खेळाशी संबंधित चित्रपट करत आहेत, यावरूनच कुस्ती हा खेळ भारतात किती लोकप्रिय आहे हे समजते.
 
प्रो रेसलिंग स्पर्धेमुळेही कुस्तीला नवी ओळख मिळण्यास मदत होईल. कुस्ती हा भारताच्या मातीतला खेळ आहे. हा खेळ फक्त मोठ्यांनाच नव्हे तर लहानांनाही आकर्षित करतो. माझा मुलगा रणवीर घरात उशीशी कुस्ती खेळत असतो, असे भारतातील प्रो रेसलिंग स्पर्धेबाबत बोलताना ते म्हणाले.
 
प्रो रेसलिंग स्पर्धेत बहल यांच्याकडे ‘हरयाणा हॅमर्स’ संघाची मालकी आहे. तर भारताचा लोकप्रिय कुस्तीगीर योगेश्वर दत्त हरयाणाच्या संघात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi