Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय नेमबाज गगन नारंगला ब्राँझपदक

ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय नेमबाज गगन नारंगला ब्राँझपदक

वेबदुनिया

लंडन , सोमवार, 30 जुलै 2012 (18:08 IST)
WD
भारतीय नेमबाज गगन नारंगने १० मीटर एअर रायफल शुटिंगमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिले आहे. पुरूषांच्‍या १० मीटर एअर रायफल स्‍पर्धेत त्याने १०३.१ गुण मिळवून कास्य पदकावर आपले नाव कोरले. भारताचे या ऑलिंपिक स्पर्धेतील पहिलेच पदक आहे.

या स्पर्धेतील सुवर्णपदक रोमानियाच्या एलिन जॉर्ज मॉल्‍दोविनेउने पटकविले तर दुस-या स्थानावर इटलीचा खेळाडू निकोलो कैम्प्रियानी हा राहिला.

बीजिंग ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीत पात्र न झालेल्या गगन नारंगने पदक मिळवीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये वैयक्कीत पदक मिळविणारा गगन नारंग हा भारताचा आठवा खेळाडू आहे. बीजिंग ऑलिंपिकमध्ये याच प्रकारात सुवर्णपदक मिळविणारा नेमबाज अभिनव बिंद्रा अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे भारतीय नागरिकांची गगनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गगनने पहिल्या फेरीपासून अचूक नेम साधत पदकाच्या आशा कायम ठेवल्या. अखेर त्याने ७०१.१ गुण मिळवित पदक आपल्या नावावर केले. रोमानियाच्या एलिन डॉर्ज मोल्देवियानू याने ७०२.१ गुण मिळवीत सुवर्णपदक मिळविले. तर इटलीच्या निकोलो कॅम्प्रियानी याने ७०१.५ गुण मिळवीत रौप्यपदक जिंकले.

नारंगच्या विजेतेपदानंतर देशभर आनंद व्यक्त करण्यात येत असून, हरियाणा सरकारकडून नारंगला एक कोटी रुपयांची घोषणा केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi