Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑलिम्पिकमध्ये मैरीकॉम पराभूत, कांस्य पदकावर समाधान

ऑलिम्पिकमध्ये मैरीकॉम पराभूत, कांस्य पदकावर समाधान

वेबदुनिया

, बुधवार, 8 ऑगस्ट 2012 (19:27 IST)
ब्रिटनच्या निकोला एडम्सने भारताच्या मैरीकॉमचा सेमीफायनलमध्ये ११-६ हरवले आणि संपूर्ण भारतीयांच्या ऑलिम्पिक गोल्डच्या आशांचा चुराळा झाला. मात्र सेमीफायनलमध्ये मजल मारून मैरीकॉमने लंडन ऑलिम्पिकच्या कांस्य पदकावर नांव कोरले आहे.

निकोला खूपच आक्रमक होती, मैरीकॉम तिच्यासमोर निष्प्रभ ठरली. भारतीय महिला मुष्टीयोद्धा कारकीर्दीत पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूविरूद्ध दोनदा पराभूत झाली आहे.

तीन राउंडनंतर भारताची मैरीकॉम ब्रिटनच्या निकोलाच्या तुलनेत ४-८ ने पिछाडीवर होती आणि तेव्हापासूनच आज निकोलाचा दिवस असल्याचे भासत होते. पहिल्या राउंडमध्ये मैरीकॉम १-३ ने पिछाडली होती आणि दुसर्‍या राउंडमध्ये ती २-५ ने मागे पडली. यानंतर तिला पुनरागमन करण्याची संधीच मिळाली नाही.

ब्रिटनची निकोला आपले ५४ किलोग्रॅम वजन घटवून ५१ किलोग्रॅम वर्गात उतरली आणि तीने आपल्या जोरदार मुक्क्यांनी पांच वेळची विश्वविजेता मैरीकॉमला निष्प्रभ करून टाकले.

दुसरीकडे चीनची रेन केन आपली सेमीफायनल लढत जिंकून ५१ किलोग्रॅम वर्गात फायनलमध्ये पोहचली असून तिचा मुकाबला निकोला सोबत होईल.

दरम्यान मैरीकॉमने लंडन ऑलिम्पिकमध्ये उतरण्याअगोदर आपले वजन ३ किलोंनी वाढवले. ५१ किलो वर्गात तीने पहिल्या लढतीत पोलंडच्या कॅरोलिनाचा १९-१४ ने पराभव केला. दुसर्‍या लढतीत तीने ट्युनिशियाच्या रहालीचा १५-६ ने पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता.

मैरीकॉम एक दृष्टिक्षेप:
महिला मुष्टियुद्धात मैरीकॉमच्या ठोस्यांना भारतच नाही तर संपूर्ण जगभरातून मान्यता मिळाली आहे. पांच वेळा विश्वविजेती ठरलेल्या मैरीकौमचे नांव मँगते चंग्नेइजँग आहे.तिचा जन्म १ मार्च १९८३ रोजी मणिपुर मध्ये झाला. वडिल शेतकरी होते. घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. बालपण संघषर्शत गेले.

मणिपुरचे बॉक्सर डिंगो सिंह यांच्या यशाने तिला बॉक्सिंग कडे आ‍कर्षित केले. तिने २००१ मध्ये पहिल्यांदा नॅशनल वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकली. २००३ मध्ये भारत सरकारने तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. २००६ मध्ये तिला पद्मश्री आणि २००९ मध्ये राजीव गांधी खेलरत्म पुरस्कार प्राप्त झाला आहे. (वेबदुनिया न्यूज)

Share this Story:

Follow Webdunia marathi