Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओ.पी. जैशाला स्वाईन फ्लू

ओ.पी. जैशाला स्वाईन फ्लू
बंगळुरु , शुक्रवार, 26 ऑगस्ट 2016 (15:12 IST)
भारताची धावपटू ओ.पी. जैशाला स्वाईन फ्लू झाला आहे. बंगळुरुमधील रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.

 रिओ ऑलिम्पिकदरम्यान जैशासोबत एकाच खोलीत राहणा-या सुधा सिंगलादेखील स्वाईन फ्लूची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. तिलादेखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जैशा आणि कविता राऊतसोबत राहिलेल्यांना स्वाईन फ्लूची लक्षणं दिसत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

रिओ ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेदरम्यान उष्ण वातावरण असताना अधिकाऱ्यांनी पाणी व एनर्जी ड्रिंक्सची व्यवस्था केली नसल्याचे आरोप केल्याने जैशा चर्चेत आलेली होती. सुधा सिंग व्यतिरिक्त धावपटू कविता राऊतची रुग्णालयात नाशिक जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती, त्यानंतर रक्ताचेही नमुने घेण्यात आले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॉट्सअॅप युझर्सची डोकेदुखी वाढणार