Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कलमाडींना लंडन ऑलिम्पिकला जाण्याची परवानगी

कलमाडींना लंडन ऑलिम्पिकला जाण्याची परवानगी
नवी दिल्ली , शुक्रवार, 13 जुलै 2012 (18:59 IST)
FILE
राष्ट्रकुल खेळातील भ्रष्ट्राचाराच्या प्रकरणातील आरोपी सुरेश कलमाडी यांना न्यायालयाने लंडन ऑलिम्पिकमध्ये जाण्याची परवानगी दिली आहे.

सीबीआय न्यायमूर्ती तलवंतसिह यांनी कलमाडींना २६ जुलै पासून १३ ऑगस्ट पर्यंत लंडनला जाण्याची परवानगी दिली. न्यायालयाने त्यांना १० लाख रूपयांचा बॉंड आणि इतक्याच रूपयांची जमानात राशी जमा करण्याचा आदेश दिला. कलमाडींना फक्त २०१२ ऑलिम्पिक खेळांसाठीच लंडनवारीची परवानगी देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

कलमाडींवर कारवाई स्थगित नाही आणि त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे वकील सुनावणीस उपस्थित राहतील, असे म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi