Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रिकेटनंतर आता शाहरुखची नजर फुटबॉलवर!

क्रिकेटनंतर आता शाहरुखची नजर फुटबॉलवर!

वेबदुनिया

नवी दिल्ली , शनिवार, 2 जून 2012 (13:09 IST)
WD
कोलकाता नाईटरायडर्सने आयपीएलच्या पाचव्या सत्राचे विजेतेपद पटकावल्यानंतर या संघाचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान खूप उत्साहित असून, लवकरच तो फुटबॉल क्लब खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे.

एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख देशातील सर्वाच जुन्या क्लबपैकी एक असलेल्या डेम्पो फुटबॉल क्लबचे 50 टक्के भागहक्क विकत घेण्याच्या तयारीत आहे.

जानकारांच्या अंदाजानुसार शाहरुखची डेम्पोतील भागीदारी जवळपास 30 कोटी रुपयांच्या घरात असणार आहे. येत्या एक-दोन आठवड्यात हा सौदा होण्याची शक्यता आहे. या दैनिकाने दिलेल्या वृत्तात शाहरुखने फुटबॉल क्लब खरेदी करण्याची पुष्टी केल्याचेही म्हटले आहे. डेम्पो क्लबचे मालक श्रीनिवस व्ही. डेम्पो यांनी याबाबत पुष्टी करताना शाहरुखसोबत अनेक वेळा चर्चा झाल्याचेही सांगितले. शाहरुख सोबतची चर्चा सकारात्मक असून, याबाबत अंतिम निर्णय होणे बाकी आहे. या व्यवहारशी निगडित असलेल्या लोकांनी सांगितले, की डेम्पो क्लबसाठी बोली लावणार्‍यांमध्ये शाहरुख एकटाच व्यक्ती नसून, एक दिग्गज भारतीय खेळाडूही या क्लबचे भागहक्क विकत घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. हा क्रिकेटपटू स्वत: फुटबॉलपयू आहे. शाहरुख आणि या क्रिकेटपटू शिवाय उद्योग जगतातील काही नामांकित व्यक्तीही या क्लबचे भागहक्क विकत घेण्याच्या तयारीत असून, डेम्पो क्लबवर सध्या गोव्यातील एका उद्योग समूहाचा मालकीहक्क आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi