Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खेळगावांत जगातिल सर्वात मोठे भोजनालय

खेळगावांत जगातिल सर्वात मोठे भोजनालय
लंडन , रविवार, 15 जुलै 2012 (18:58 IST)
ऑलिम्पिक खेळाडूंना खेळगांवात तब्बल १३०० प्रकारचे पक्वानं उपलब्ध राहणार आहेत. जगभरातून येणार्‍या खेळाडूंसाठी व्हिक्टरी पार्क सज्ज झाले आहे.

PR
PR
हे विशालकाय भोजनालय आतापर्यंतचे जगातील सर्वात मोठे भोजनालय आहे. खेळाडू आणि अधिकार्‍यांसाठी खेळगांव औपचारिकत्या सोमवारपासून खुले करण्यात येईल.

भोजनालयाची गुणवत्ता आणि सौदर्य वेधक आहे. भोजनालयाचे क्षेत्रफळ इतके मोठे आहे की एकावेळी ८८० डबल डेकर बसेस पार्क करता येऊ शकते, असे कॅटरिंग प्रमुख जेनेट मॅथ्यूज यांनी सांगितले.

खेळांदरम्यान हे भोजनालय सातही दिवस आणि चोवीस तास सुरू राहिल आणि एकावेळी ५००० व्यक्ति बसू शकतात. सर्वात व्यस्त दिवसांत सुद्धा दिवसभरात ६५ हजार व्यक्तिंना जेवन वाढण्यात येईल. संपूर्ण खेळांदरम्यान जवळपास १२ लाख ताटं वाढण्यात येईल, असा अंदाज आहे.

१.१ अरब पौंडाचा खर्चून स्ट्रॅटफोर्ड भागात हे खेळगांव बनले आहे. २०३ देशातील जवळपास १६ खेळाडू आणि अधिकार्‍यांना थांबण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. ७५०० कार्यकर्ते येथे नेहमी तैनात राहतील आणि ३५०० आगुंतकांचे येणे-जाणे सुरू राहिल.

संपूर्ण खेळगांवास तिन भागात विभागण्यात आले आहे. कंटीसाइड, सीसाइड आणि हेरिटेज अशी नांवे त्यांना देण्यात आली आहेत. आणि त्यानुरूप सजावट करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi