Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोळाफेकपटू इंद्रजित सिंह उत्तेजक चाचणीत दोषी

गोळाफेकपटू  इंद्रजित सिंह उत्तेजक चाचणीत दोषी
दिल्ली , मंगळवार, 26 जुलै 2016 (10:45 IST)
एशियन चॅम्पिअनशिप, एशिअन ग्रँड प्रिक्स आणि वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणारा गोळाफेकपटू  इंद्रजित सिंह उत्तेजक चाचणीत दोषी आढळला आहे. राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीने अॅथलेटिक्स फेडरेशनला पत्र पाठवून गोळाफेकपटू इंद्रजित सिंह डोपिंग चाचणीत बाद झाल्याची माहिती दिली आहे. बंदी असलेल्या स्टेराईडचा वापर करताना इंद्रजित सिंहला पकडण्यात आले होते.

इंद्रजित सिंहकडून भारताला खूप अपेक्षा होत्या. रिओ ऑलिम्पिकसाठी भारताकडून जास्तीत जास्त खेळाडू पाठवण्यात येणार आहेत. मात्र नरसिंग यादव आणि त्यानंतर आता इंद्रजित सिंह डोपिंग चाचणीत बाद झाल्याने जागतिक स्तरावर डोपिंगची पाहणी करणा-यांसमोर भारतीय खेळाडूंसंबंधी शंका निर्माण होण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एक्सप्रेसवेवर भीषण अपघात ; 5 जणांचा मृत्यू