Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ग्रॅण्डस्लॅम फायनलमध्ये नोव्हाकविरुद्ध नदाल

ग्रॅण्डस्लॅम फायनलमध्ये नोव्हाकविरुद्ध नदाल

वेबदुनिया

पॅरिस , शनिवार, 9 जून 2012 (10:09 IST)
WD
जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावर असलेला नोव्हाक डेकोव्हिच आणि दुसर्‍या स्थानावरील राफेल नदाल फ्रेंच ओपनच्या अजिंक्यपदासाठी भिडतील. दोघेही ग्रॅण्डस्लॅमच्या फायलनमध्ये भिडण्याची ही विक्रमी चौथी वेळ आहे. नदालने डेव्हिड फेररचा तर नोव्हाकने रॉजर फेडररला सेमीफायनलमध्ये पराभूत केले.

गेल्या वर्षी सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्याचा बदल घेताना नोव्हाकने जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर असलेल्या फेडररला ६-४, ७-५ आणि ६-३ असा स्वित्झर्लंडचा रस्ता दाखविला. नदाल आता सातव्या तर नोव्हाक सलग चौथ्या ग्रॅण्डस्लॅमसाठी प्रयत्न करेल.

तत्पूर्वी, ‘क्ले कोर्ट किंग’ अशी बिरुदावली मिरवणार्‍या दुसर्‍या मानांकित स्पेनच्या राफेल नदालने त्याचा मायदेशातील सहकारी सहाव्या मानांकित डेव्हिड फेररचा ६-२, ६-२, ६-१ ने पराभव केला पहिला सेट ६-२ ने जिंकल्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये नदाल आघाडीवर असताना पावसाचा व्यत्यय निर्माण झाला. पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर नदालने कामगिरीत सातत्य राखताना दुसरा सेट ६-२ ने जिंकत २-0 अशी आघाडी मिळवली. दोन सेटने पिछाडीवर पडलेल्या फेररने तिसर्‍या सेटमध्ये संघर्ष करण्याचा प्रयत्न केला; पण, नदालच्या आक्रमक खेळापुढे त्याचा निभाव लागला नाही आणि पहिल्यांदाच ग्रॅण्डस्लॅम फायनलचे फेररचे स्वप्न भंगले.

Share this Story:

Follow Webdunia marathi