Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जोकेविक दुसर्‍या फेरीत

जोकेविक दुसर्‍या फेरीत

वेबदुनिया

WD
सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविकने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद राखण्याच्या दिशेने पाऊल टाकत सोमवारी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत सहज विजय मिळवित दुसरी फेरी गाठली. सर्बियाच्याच जांको टिप्सारेविकनेही लिटन हेविटला पराभूत करून आपल्या अभियानाची धडाक्यात सुरुवात केली.

स्पर्धेचे अव्वल मानांकन असलेल्या जोकोविकने फ्रान्सच्या पॉल-हेन्री माथियेऊला 6-2, 6 -4, 7-5 असे पराभूत करून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला, तर आठव्या मानांकित टिप्सारेविकने हेविटला 7-6, 7-5, 6- 3 असे पराभूत केले. दरम्यान महिला एकेरीत ऑस्ट्रेलियाचीच समांथा स्टोसूर आणि पोलंडची अ‍ॅग्निएस्का रांद्वास्कानेही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवित दुसरी फेरी गाठली.

Share this Story:

Follow Webdunia marathi