Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टेनिस पुरुष एकेरीचे सुवर्ण मरेला

टेनिस पुरुष एकेरीचे सुवर्ण मरेला

वेबदुनिया

WD
ब्रिटनच्या अँडी मरेने गत महिन्यात विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढताना ‍रविवारी ऑलिम्पिकच्या पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. सेंटर कोर्टवर झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत मरेने फेडररला 6-2, 6-1, 6-4 असे एकतर्फी पराभूत केले. नेमके चार आठवड्यांपूर्वी आणि याच कोर्टवर विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत फेडररने मरेला पराभूत करून कारकिर्दीतील 17वे ग्रॅन्ड स्लम विजेतेपद पटकावले होते.

या पराभवामुळे फेडररचे चारही ग्रँडस्लम स्पर्धांसह ऑलिम्पिकचे विजेतेपद पटकावून गोल्डन कॅरियर पूर्ण करण्याचे स्वप्नही संपुष्टात आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi