Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डेन्मार्क ओपनसाठी सायना सज्ज

डेन्मार्क ओपनसाठी सायना सज्ज

वेबदुनिया

WD
लंडन ऑलिम्पिकनंतर दोन माहिने विश्रांती घेतल्यानंतर सायना नेहवाल आजपासून प्रारंभ होत असलेल्या डेन्मार्क ओपन सुपर ‍सीरिजमध्ये बहारदार कामगिरीसाठी सज्ज झाली आहे. ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकल्यानंतर सायना चायना मास्टर्स, जपान ओपन आणि ‍सीनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत खेळली नव्हती.

जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेली सायना आता डेन्मार्क आणि फ्रान्समध्ये दोन स्पर्धा खेळणार आहे. डेन्मार्क ओपनसाठी सायनाला तिसरे मानांकन देण्यात आले आहे. पहिल्या फेरीत तिची लढत कोरियाच्या यियोन जबेइविरुद्ध होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत सायनाची लढत ब्रिटनच्या टायनी ब्राऊनशी होऊ शकते. ऑलिम्पिकमध्ये सायनाने ब्राऊनचा पराभव केला होता. पुरुष गटात सौरभव वर्माची लढत पहिल्या फेरती जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या यजमानांच्या पीटर गेडशी होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi