Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थाईलंड खुले बॅडमिंटनमध्ये सायना उपान्त्पूर्व फेरीत

थाईलंड खुले बॅडमिंटनमध्ये सायना उपान्त्पूर्व फेरीत

वेबदुनिया

WD
माजी विजेती भारताची सायना नेहवाल, एच. एस. प्रणॉय आणि के. श्रीकांत यांनी थाईलंड ग्रँडप्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत उपान्त्पूर्व फेरी गाठली.

महिला एकेरीत अग्रमानांकित सायनाने इंडोनेशियाच्या फेबी अनगुनीचा 21-12, 21-11 असा एक तास भरातच पराभव केला.

उपान्त्पूर्व फेरीत सायनाला आठव्या स्थानावरील जुआन जू (सिंगापूर) हिचशी खेळावे लागेल. जुआने तिची सहकारी झिआयू लिआंग हिचा 21-13, 21-11 असा पराभव केला.

पुरुष एकेरीत प्रणॉयाने भारताच्याच आनंद पवारचा 19-21, 21-13, 21-15 असा तर के. श्रीकांतने कोरियाच्या हवांग जोंग सू याचा 21-19, 21-15 असा पराभव केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi