Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नदाल ऑस्ट्रेलियन ओपनद्वारे पुनरागमन करणार!

नदाल ऑस्ट्रेलियन ओपनद्वारे पुनरागमन करणार!

वेबदुनिया

WD
गुडघ्याच्या दुखापतीमुळे दीर्घकाळ टेनिस कोर्टपासून दूर असलेला जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू स्पेनचा राफेल नदाल जानेवारीत होणार्‍या ऑ‍स्ट्रेलियन ओपनद्वारे स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन करणार आहे. नदालने 2009मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद टकावले होते. कारकीर्दीत 11 ग्रँडस्लम विजेतेपद पटकावणार नदाल यंदा जून महिन्यात विम्बलडन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत 100व्या स्थानी असलेल्या लुकास रोसोलकडून धक्कादायक पराभव पत्करल्यापासून टेनिस कोर्टाबाहेरच आहे. गुडघ्याच्य दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी त्याला तब्बल पाच महिन्यांचा कालावधी लागला. आपण येत्या 27 डिसेंबरला अबुधाबीमध्ये होणार्‍या प्रदर्शनी सामन्यात खेळणार असल्याचे नदालने अलीकडेच सांगितले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi