Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नैतिकदृष्‍ट्या अंध तिरंदाजाचा विश्वविक्रम

नैतिकदृष्‍ट्या अंध तिरंदाजाचा विश्वविक्रम

वेबदुनिया

लंडन , शनिवार, 28 जुलै 2012 (12:41 IST)
WD
दक्षिण कोरियाचा नैतिकदृष्‍ट्या अंध तिरंदाज इम डाँग-ह्युनने शुक्रवारी लंडन ऑलिम्पिकमधील पहिल्या विश्वविक्रमाची नोंद केली, तसेच दक्षिण कोरियाने आणखी एका सांघिक विक्रमाची नोंदही केली.

लंडनमधील लॉर्ड्‍स मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पुरुष तिरंदाजंच्या प्राथमिक फेरीत इमने 73 अॅरोमध्ये 6 99 गुणांची कमाई करताना या वर्षी मे महिन्यात नोंदविलेला स्वत:च्या 696 गुणांचा विक्रम मोडला.

दक्षिण कोरियाचा चंगबुकमधील इम हा नैतिकदृष्ट्या अंध असून त्याची डाव्या डोळ्याची दृष्टी 20/200 अशी, तर उजव्या डोळ्याची दृष्टी 20/100 अशी आहे. म्हणजे इतरांप्रमाणे ठळक दृष्टीच्या तुलनेत तो 10 पट कमजोर आहे. इमने 2004 आणि 2008च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. त्याने आशियाई स्पर्धेतही चार सुवर्णपदके जिंकली आहेत.

या विश्वविक्रमानंतरही इम समाधानी झालेला नसून, शनिवारी तिरंदाजीची स्पर्धा पुढे खेळल्या जाईल, त्यावेळी तो सुवर्णपदक पटकावण्याचा प्रयत्न करेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi