Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीला विजेतेपद

पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीला विजेतेपद
, शनिवार, 3 ऑक्टोबर 2015 (11:04 IST)
पुणे- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सतरा वर्षांखालील मुलांच्या गटाच्या नेहरू करंडक राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत क्रीडापीठ विभागाचे प्रतिनिधित्व करणार्‍या पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनी संघाने विजेतेपद मिळविले. क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी दुहेरी विजेतेपद मिळविले असून, मुलींच्या गटातही ते विजेते ठरले होते. कोल्हापुराने तिसरा क्रमांक पटकविला.

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत क्रीडापीठ विभागाचे प्रतिनिधित्व करणार्‍या पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनी संघाने अंतिम लढतीत मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करणार्‍या अवर लेडी प्रशाला संघाचा पाच गोलच्या फरकाने पराभव केला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi