Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्राऊनकडून नदाल पराभूत

ब्राऊनकडून नदाल पराभूत
लंडन , शनिवार, 4 जुलै 2015 (11:30 IST)
जागतिक क्रमवारीत १०२ व्या स्थानावर असलेल्या जर्मनच्या ब्राऊनने २००८ आणि २०१०मध्ये विम्बल्डनचा विजेता आणि २००६, २००७ आणि २०११ मध्ये उपविजेता ठरलेल्या नदालला ७-५, ३-६, ६-४, ६-४ या सेटमध्ये पराभूत केले.
 
टेनिस जगतातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणा-या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद झाली. १४ ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळवणा-या स्पेनच्या राफेल नदालचे स्पर्धेच्या दुस-या फेरीतच आव्हान संपुष्टात आले. जर्मनीच्या डस्टिन ब्राऊनने नदालवर सनसनाटी विजय मिळवत पुढील फेरीत आगेकूच केली.
 
जर्मनीतील सेली गावात जन्मलेल्या डस्टिन ब्राऊन याचे वडील लेरॉय जमैकाचे असून आई इनगे जर्मनीची आहे. त्याची आजी ब्रिटिश असून तिच्यामुळेच तो ग्रेट ब्रिटनकडून डेव्हिस कपमध्ये खेळत होता.
 
* 19 वर्षात डस्टिनने केस कापलेले नाहीत.
 
* सर्व टेनिस स्पर्धासाठी डस्टिन ब्राऊन तची कॅम्पर व्हॅन घेऊनच जातो.
 
गेल्या महिन्यात झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळवण्याचे त्याचे स्वप्न जोकोविचने भंग केले होते. त्यानंतर आता विम्बल्डन स्पर्धेत पात्रता फेरीतच आव्हान संपुष्टात आले. विम्बल्डन स्पर्धेतून लवकर बाहेर पडण्याची नदालची ही सलग चौथी वेळ आहे. 
 
यापूर्वी २०१२ मध्ये ल्युकास रोसोलकडून पराभव झाल्याने त्याचे आव्हान दुस-या फेरीतच संपुष्टात आले होते. २०१३ मध्ये १३५ व्या स्थानी असलेल्या स्टीव्ह डर्कीने पहिल्याच फेरीत नदालवर विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ मध्ये निक क्यारर्गियोसने चौथ्या फेरीत नदालचे आव्हान संपुष्टात आणले होते. 
 
‘मी हरलो. त्यासाठी नक्कीच दु:ख वाटत आहे. मात्र हा खेळ आहे. चांगले वाईट क्षण येतच असतात. आजचा क्षण माझ्यासाठी दु:खाचा आहे. खेळात हे सर्व काही घडू शकते हे मला स्वीकारण्याची गरज आहे. या पराभवातून शिकून मी पुढे जात राहणार. जीवन सुरुच राहते आणि माझी कारकिर्दीही.’ अशी प्रतिक्रिया नदालने सामना संपल्यानंतर दिली. 
 
१९ वर्षीय ब्राऊनचा पराक्रम 
आपला वेगळा अंदाज आणि लुक्‍समुळे ब्राउन रॉकस्‍टारचा दर्जा मिळालेला आहे. ब्राउनीची उंची ६ फूट पाच इंज आहे. त्‍याने १९ वर्षापासून केस कापलेले नाहीत. त्‍याला टॅटू गोंदवून घेण्‍याचा छंद आहे. या शिवाय तो स्‍पर्धेत खेळण्‍यासाठी खास कँपर व्‍हॅनमध्‍ये पोहोचतो. याच व्‍हॅनमधून तो पूर्ण युरोप फिरून आल्‍याचे सूत्रांनी सांगितले. हा विजय आपल्‍या आयुष्‍यातील सर्वांत चांगला दिवस असल्‍याचे त्‍याने सांगितले. त्‍याने यापूर्वीसुध्‍द़ा नदालला हरवलेले आहे. पण, ती गत वर्षी विंबलडनमध्‍ये झालेली सराव मॅच होती. 
 
दुसरीकडे नदालला ही स्‍पर्धा अत्‍यंत वाईट गेली. यापूर्वी तो फ्रेंच ओपनच्‍या उपांत्‍य सामन्‍यात स्‍पर्धेबाहेर पडला होता. नउ वेळा फ्रेंच ओपन स्‍पर्धा जिंकून त्‍याने विक्रम स्‍थापन केलेला आहे. पराभवानंतर नदालने म्‍हटले, ‘हा शेवट नाही. हा त्रासदायक काळ आहे. पण, लवकरच यातून बाहेर पडू.’ 

Share this Story:

Follow Webdunia marathi