Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय तिरंदाजांजी निराशाजनक कामगिरी

भारतीय तिरंदाजांजी निराशाजनक कामगिरी

वेबदुनिया

लंडन , शनिवार, 28 जुलै 2012 (12:42 IST)
WD
जयंत तालुकदार, तरुणदीप राय आणि राहुल बॅनर्जीच्या भारतीय त्रिकुटाने मिळून या दिवशी केवळ 1969 गुणांची कमाई केली, तर गत विजेता दक्षिण कोरयाने मात्र सांघिक विश्वविक्रमाची नोंद करताना 2,087 गुणांती कमाई करीत रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले.

व्यक्तिगत प्रदर्शनात भातराकडून तरुणदीपने सर्वश्रेष्ठ कामगिरी करताना 72 शॉट्‍समध्ये 664 गुण, राहुल बॅनर्जीने 46 शॉट्‍समध्ये 655, तर तालुकदारने 53 शॉट्समध्ये 650 गुणांची कमाई केली. दक्षिण कोरियाकडून डाँग ह्युनने 699/720चा स्कोर करताना व्यक्तिगत विश्वविक्रमाची नोंद केली. या राऊंडमध्ये फ्रान्सच्या संघाने 2021च्या स्कोरसह दुसरे स्थान पटकावले. या रँकिंग राऊंडनंतर 12 संघातील प्रत्येक संघ बाद फेरीत एकमेकांविरुद्ध सहा अ‍ॅरोजचे चार सेट खेळतील. प्रत्येक तिरंदाजाला दोन वेळा लक्ष्यभेद करण्याची संधी मिळणार आहे. यात सर्वाधिक गुणांची कमाई करणारा संघ विजयी ठरणार असून, याच प्रकारे ही स्पर्धा पुढे खेळली जाऊन स्पर्धेतील अव्वल संघ निश्चित होणार आहे. यात दोन संघांचे गुण बरोबरीवर असले, तर त्यांच्यात तीन अ‍ॅरोजचा शूट-ऑफ खेळला जाईल आणि त्याही निकाल लागू शकला नाही, तर लक्ष्याचा खूप जवळ निशाणा साधणार्‍या संघाला विजेता घोषित करण्यात येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi