Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भूपती-सानियाची फायनलमध्ये धडक!

भूपती-सानियाची फायनलमध्ये धडक!

वेबदुनिया

पॅरिस , गुरूवार, 7 जून 2012 (12:20 IST)
WD
सेमीफायनलमधील सोप्या विजयासह भारताच्या महेश भूपती आणि सानिया मिर्झाने फ्रेंच ओपनच्या मिश्र दुहेरीत फायनलमध्ये धडक मारली. ग्रॅण्डस्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचण्याची या जोडीची ही तिसरी वेळ आहे. आता ऑस्ट्रेलियन ओपननंतर दुसरे ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा प्रयत्न ही जोडी करेल.

सातव्या मानांकित भारतीय जोडीने एक तास १0 मिनिटे चाललेल्या सेमीफायनलच्या लढतीत गालिना वोस्कावोवा आणि डेनेली ब्रासेली या इटालियन-कझाक जोडीचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये भूपती - सानियाला आपल्याच देशाचा लिएंडर पेस आणि त्याची रशियन जोडीदार इलिना वेसनिनाचा सामना करावा लागू शकतो. एलिना सानियाची महिला दुहेरीतील जोडीदार असून, भूपतीसह तिने विम्बल्डनच्या फायनलमध्ये धडक मारली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi