Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मरिअन बारतोली व लिसिकी अंतिम फेरीत

मरिअन बारतोली व लिसिकी अंतिम फेरीत

वेबदुनिया

WD
विम्बल्डन खुले टेनिसलंडन, दि. 4- येथे खेळ्या जात असलेल्या ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लबच्या विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या मरिअन बारतोली हिने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.

काल खेळल्या गेलेल्या पहिल्या उपान्त्य सामन्यात बारतोलीने बेल्जियमच्या कर्स्टन-फ्लिपकेन्स हिचा सरळ दोन सेटमध्ये 6-1, 6-2 असा सहज पराभव केला. बारतोलीने दुसर्‍या वेळी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. 15व्या स्थानावरील मरिअनने पहिल्या सेटमध्ये 3-0 अशी आघाडी घेतली. पुन्हा तिने दुसर्‍या टप्क्यात आणखी 3-0 अशी आघाडी घेतली. तिने फ्लिपकेन्सच सर्व्हिसवर ब्रेकपॉईंट मिळविले व पहिला सेट 6-1 असा आरामात घेतला. बेल्जियमची फ्लिपकेन्स ही 20व्या स्थानावर आहे व ती प्रथमच या स्पर्धेत उपान्त्य फेरीत खेळत होती.

बारतोलीने 2007 साली अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी, अमेरिकेच्या व्हीनस विलिअम्सने तिचे आव्हान सरळ सेटमध्ये मोडित काढले होते. बारतोलीने उपान्त्पूर्व फेरीत स्टिफन्सचा दोन सेटमध्ये पराभव केला होता.

विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपान्त्य सामन्यात 23 व्या मानांकित जर्मनीच्या सबिने लिसिकी हिने चौथ्या मानांकित पोलंडच्या अग्निएस्का राडवानस्का हिचा खळबळजनक पराभव केला.

आता लिसिकीचा विम्बल्डनच अंतिम फेरीत बारतोली हिच्याशी शनिवारी सामना होणार आहे. लिसिकी व राडवानस्का यांच्यातील सामना अतिशय रंगला होता. पहिला सेट लिसिकीने 6-4 असा घेतला. तर दुसरा राडवानस्काने 6-2 असा घेतला. तिसर्‍या सेटमध्ये पहिले दोन्ही पाँइंट राडवानस्काने घेतले. पण लिसिकीने नंतर 4-4 अशी बरोबरी साधली. राडवानस्काने 9 व्या गेममध्ये ब्रेक पॉईंट तर लिसिकीने दहाव्या गेममध्ये ब्रेक पॉइंट घेतला. त्यानंतर 5-5 अशी बरोबरी झाली. त्यानंतर सातव्या गेमपर्यंत 7-7 अशी बरोबरी झाली. नंतर लिसिकीने 15 व 16व्या गेम लागोपाठ घेऊन तिसरा सेट 9-7 असा जिंकला.

विम्बल्डनपूर्वी या दोघीत दोन सामने खेळले गेले होते. 2011मध्ये स्टॅनफोर्ड येथे लिसिकीने राडवनस्काचा पराभव केला होता. त्यानंतर एक वर्षाने दुबई टुर्नामेंटमध्ये राडवनस्का ही विजयी ठरली होती. हा सामना दोन तासाच्यावर खेळला गेला.
टेनिसमधील पहिले तीन मानांकित खेळाडू बाहेर पडल्यामुळे चौथी मानांकित राडवनस्का ही विम्बल्डनची दावेदार समजली जात होती. परंतु सबिनेची क्षमता व ताकद हे राडवनस्काच्या खेळातील वैविध्यतेला भारी पडले.

Share this Story:

Follow Webdunia marathi