Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मरेने रचला इतिहास

मरेने रचला इतिहास

वेबदुनिया

WD
लंडन ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेत्या ब्रिटनच्या अँडी मरेने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून पाच तास रंगलेल्या अंतिम लढतीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला कडवी झुंज देत ७-६, ७-५, २-६, ३-६, ६-२ असा पराभव करून यूएस ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले. मरेने ब्रिटनचा ७६ वर्षांचा ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा दुष्काळ संपवीत इतिहास रचला.

ऑर्थर ऐश स्टेडियमच्या टेनिस कोर्टवर सोमवारी रात्री झालेल्या या चुरशीच्या रोमांचक लढतीत मरेने आपल्या पहिल्या ग्रॅण्डस्लॅमवर नाव कोरले. याबरोबरच मरेने ७६ वर्षांपूर्वी १९३६ मध्ये ब्रिटिश खेळाडू फ्रेड पॅरीनंतर विजेतेपद जिंकून इतिहास रचला. वेगाने वाहणारा वारा, जवळजवळ सात दशकांची प्रतीक्षा आणि विजेतेपद जिंकण्याचे ओझे घेऊन खेळणार्‍या २५ वर्षीय मरेने दोन सेट गमाविल्यानंतरसुद्धा आक्रमक व वेगवान फटके मारून जोकोविचला नामोहरम केले.

सलग चार ग्रॅण्डस्लॅममध्ये पराभव पत्करणार्‍या मरेला बिटनच्या टेनिस क्षेत्रात टिकेला सामोरे जावे लागले होते. विजेतेपद जिंकल्यानंतर मरे म्हणाला, ‘‘मी खूप मोठे ओझे डोक्यावर घेऊन मैदानात उतरलो होतो. गेल्या चार स्पर्धेत पराभव पत्करलेला असतानासुद्धा जिंकण्याच्या ईर्षेने खेळत होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi