Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मारियाच राणी..

मारियाच राणी..

वेबदुनिया

WD
खांद्याच्या दुखापतीनंतर कारकीर्द संपली, अशी ओरड करणार्‍या टीकाकारांना जबरदस्त उत्तर देत रशियन ब्युटी मारिया शारापोव्हाने फ्रेंच पनचे अजिंक्यपद ‘राणी’च्या थाटात जिंकले. पात्रता फेरीतून फायनलपर्यंत धडक मारलेल्या इटलीच्या सारा इराणीचा ६-३, ६-२ असा फक्त ९0 मिनिटांत पराभव केला.

जागतिक क्रमवारीत नुकतेच पहिले स्थान काबिज केलेल्या मारीयाने जोरदार फटक्यांनी या फायनलमध्ये २१व्या मानांकित साराला फारशी संधीच दिली नाही. कारकिर्दीतील ग्रॅण्डस्लॅम पूर्ण करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या शारापोव्हाने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले.

६-३ने पहिला सेट जिंकणार्‍या शारापोव्हाने दुसर्‍या सेटमध्ये सुरुवातीलाच साराची सर्व्हिस भेदली. त्यानंतर ६-२ने सेट जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. शारापोव्हाने या लढतीत चार एस व ३६ विनर्स लगावले.

Share this Story:

Follow Webdunia marathi