Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मैरीकॉम सेमीफायनलमध्ये, पदक नक्की

मैरीकॉम सेमीफायनलमध्ये, पदक नक्की

वेबदुनिया

लंडन , सोमवार, 6 ऑगस्ट 2012 (20:25 IST)
FILE
भारताची स्टार मुष्टियोद्धा मैरीकॉमने ट्युनिशियाच्या रहालीचा १५-६ ने पराभव करत लंडन ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर तीने पदक नक्की केले. सेमीफायनलमध्ये ती ब्रिटनच्या खेळाडूविरूद्ध भिडेल.

मैरीकॉमने ट्युनिशियाच्या खेळाडूस एकतर्फी लढतीत पराभूत केले. चार राउंड नंतर मैरीकॉम ११-४ ने आघाडीवर होती, तेव्हाच तीने सेमीफायनल बुक केले होते. दुसर्‍या राउंड मध्ये तीने विरोधी खेळाडूची शैली लक्षात घेऊन दमदार ठोसे लगावले.

मैरीकॉम ४८ किलोग्रॅममध्ये पाचवेळा जगज्जेता राहिली आहे. संपूर्ण देशास तिच्याकडून सुवर्ण पदकाची आशा आहे. महिला मुष्टियुद्धात मैरीकॉमच्या ठोस्यांना भारतच नाही तर संपूर्ण जगभरातून मान्यता मिळाली आहे. पांच वेळा विश्वविजेती ठरलेल्या मैरीकौमचे नांव मँगते चंग्नेइजँग आहे.

तिचा जन्म १ मार्च १९८३ रोजी मणिपुर मध्ये झाला. वडिल शेतकरी होते. घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. बालपण संघषर्शत गेले. मणिपुरचे बॉक्सर डिंगो सिंह यांच्या यशाने तिला बॉक्सिंग कडे आ‍कर्षित केले.

तिने २००१ मध्ये पहिल्यांदा नॅशनल वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकली. २००३ मध्ये भारत सरकारने तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. २००६ मध्ये तिला पद्मश्री आणि २००९ मध्ये राजीव गांधी खेलरत्म पुरस्कार प्राप्त झाला आहे. (वेबदुनिया न्यूज)

Share this Story:

Follow Webdunia marathi