Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रकुल घोटाळ्याची सीव्हीसी चौकशी

राष्ट्रकुल घोटाळ्याची सीव्हीसी चौकशी

वेबदुनिया

2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विविध विभागांमार्फत करण्यात आलेल्या 3500 कोटी रुपयांच्या 30 कामांची केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) चौकशी करणार आहे. केंद्र व राज्य सरकारमधील सार्वजनिक बांधकाम विभाग, दिल्ली महानगरपालिका, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीने स्पर्धेआधी विविध विकास कामे केली होती.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 3 ते 14 ऑक्टोबर 2010 दरम्यान येथे पार पडल्या होत्या. स्पर्धेआधी करण्यात आलेल्या विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या आरोपांमुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निवृत्त नियंत्रक व महालेखापाल व्ही.के. शुंगलू यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या सहा अहवालांत विविध कामांमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आली होती. तसेच इतर 26 प्रकरणांची चौकशी सुरू आहे. ही सर्व कामे साधारण 3316 कोटी रुपयांची होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संबंधित कामांच्या चौकशीचे निर्देश राज्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाला दिले आहेत.

दक्षता आयोगाने अधिक चौकशीसाठी काही प्रकरणे सीबीआयकडे हस्तांतरित केली आहेत. चौकशी विविध टप्प्यांवर असून भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत विविध विभागांना म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. अनेक विभाग उत्तर देण्यासाठी विलंब करत आहेत.

सरकारच्या 37 खात्यांमार्फत 9000 प्रकल्पांमध्ये जवळपास 13000 कोटींचा खर्च झाला आहे. सीव्हीसीने स्पध्रेतील 70 भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी केली आहे. त्यातील 20 प्रकरणांची चौकशी बंद केल्याची माहिती सू़त्रांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi