Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रियो ऑलिंपिक 2016च्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

रियो ऑलिंपिक 2016च्या 10 महत्त्वाच्या गोष्टी
, शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 (14:10 IST)
खेळांच्या महाकुंभात भाग घेण्यासाठी 206 देशांचे खेळाडू ब्राझील येथे पोहोचले आहे. 28 खेळांना बघण्यासाठी अब्जो लोको बनतील प्रेक्षक. रशियन डोपिंग स्कँडल, झिका वायरस, रियोमध्ये सुरक्षा, मॅनेजमेंट आणि जागा ह्या सर्वांचे वृत्त येत आहे.   
 
रियो ऑलिंपिकबद्दल जबरदस्त माहोल तयार झाला आहे. अशात तुम्हाला ही ऑलिंपिकशी निगडित बर्‍याच काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील ज्या तुम्हाला आश्चर्यात टाकून देतील. तर बघूया ऑलिंपिकबद्दल 10 खास गोष्टी.  
 
1. ऑलिंपिक गेम्समध्ये जगातील किमान 200 देशांचे खेळाडू भाग घेतात.    
 
2. ऑलिंपिक गेम्सचे आयोजन प्राचीन ऑलिंपिक गेम्सवर आधारित आहे. हे गेम्स ओलंपिया (ग्रीस)मध्ये आठवी शताब्दी बीसी ते  चवथी शताब्दी एडीपर्यंत आयोजित झाले होते.  
 
3. ऑलिंपिक गेम्समध्ये वीसवी आणि एकवीसवी शताब्दीदरम्यान बरेच बदल आले आहे. या बदलांबद्दल ऑलिंपिक गेम्समध्ये आईस, विंटर स्पोर्ट्स, पॅरालंपिक गेम्स (अपंग लोकांसाठी) आणि यूथ ऑलिंपिक गेम्स फॉर टीनेजर आयोजित करण्यात येऊ लागले.    
 
4. वर्ल्डवारमुळे 1916, 1940 आणि 1944मध्ये ऑलिंपिक गेम्स कँसल झाले होते.   
 
5. कोल्डवारमुळे 1980 आणि 1984मध्ये ऑलिंपिक गेम्सचा फार मोठ्या प्रमाणात बॉयकॉट करण्यात आला होता.

6. इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी ऑलिंपिक गेम्सच्या आयोजनासाठी जागेची निवड करते. हिच कमिटी ऑलिंपिकसाठी धन आणि   गेम्सचे निर्धारण करते.   
 
7. ऑलिंपिक गेम्स एवढा मोठा आयोजन आहे की जगातील सर्वच देशातील खेळाडू यात सामील होतात.  
 
8. ऑलिंपिकचे मोठे आयोजन बनल्यामुळे याला बर्‍याच प्रकारचे चॅलेंज, विवाद आणि आव्हानांचा समोर जावे लागते. यात बॉयकॉट्स, डोपिंग, लाच आणि दहशतवादी हल्ले सामील आहे.  
 
9. प्राचीन ऑलिंपिक गेम्स धार्मिक आयोजन होते आणि प्रत्येक चार वर्षांमध्ये हा उत्सव ज्यूस (गॉड)च्या भागात ओलंपिया (ग्रीस)मध्ये आयोजित करण्यात येत होता.   
 
10. प्राचीन ऑलिंपिक गेम्समध्ये बरेच शहर, राज्य आणि प्राचीन ग्रीसचे बर्‍या सल्तनत सामील होत्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुवर्ण पदक मिळालेले पाहायचे - बलबीरसिंह