Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विजय कुमारला ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक

विजय कुमारला ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक
लंडन , शनिवार, 4 ऑगस्ट 2012 (10:31 IST)
FILE
भारताचा नेमबाज विजय कुमार याने लंडन ऑलिम्पिकमध्ये पुरूषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्टल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. फायनल मुकाबल्यात त्याने आठ राउंडच्या फायरींग मध्ये ३० अंक नोंदवले.

याचसोबत निशानेबाजीत भारताच्या नावांवर दोन पदकं जमा झाली आहेत. याअगोदर गगन नारंगने कांस्य जिंकले होते. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धूमल यांनी विजयला १ कोटी रूपयांचा पुरस्कार जाहिर केला आहे.

२५ मीटर रॅपिड फायर पिस्टल मध्ये ३४ अंक घेऊन क्युबाचा नेमबाज लॉरिस पूपो याने स्पर्धेत सुवर्णावर नांव कोरले. विश्व विक्रमाची बरोबरी करताना लॉरिस ने हे साध्य केले. पूपो ने ३४ तर विजयने ३० अंक नोंदवले. चीनच्या डिंग फँग ने २७ अंक मिळवत कांस्य पटकावले.

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पहिले रजत पदक आहे. याअगोदर जॉयदीप कर्माकर ५० मीटर रायफल प्रोन स्पर्धेत केवळ ९ अंकांनी चूकला. ६९९.१ अंक मिळवत तो चौथ्या क्रमांकावर राहिला. पात्रता फेरित विजयने ५८५ अंक मिळवत चौथ्या स्थानी राहिला होता. मात्र ५० मीटर रायफल प्रो फायनल मध्ये गगन नारंग ने निराश केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi