Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शारापोव्हा तिसर्‍यांदा सेमीफायनमध्ये

शारापोव्हा तिसर्‍यांदा सेमीफायनमध्ये

वेबदुनिया

, गुरूवार, 7 जून 2012 (12:26 IST)
WD
एस्टोनियाच्या काइया केनेपीला ६-२, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभूत करून रशियन ब्युटी मारिया शारापोव्हाने तिसर्‍यांदा फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये पाऊल ठेवले. सेमीफायनलमध्ये तिची गाठ झेक गणराज्याच्या पेत्रा क्वितोव्हाशी होईल. २00७ आणि २0११ साली मारियाने सेमीफायनल गाठली होती.

मारियाने उपांत्यपूर्व फेरीत सोपा विजय नोंदविला. शारापोव्हाने केनेपीविरुद्ध पहिल्यापासूनच धारदार सर्व्हिसने सुरुवात केली. त्यामुळे पहिला सेट जिंकण्यास तिला फारसा वेळ लागला नाही. आठव्या गेममध्ये केनेपीने दोन सर्व्हिस पॉइंट वाचवले. पण शारापोव्हाने तिसरा सेट पॉइंट तुफानी सर्व्हिसच्या मदतीने जिंकला.

दुसर्‍या सेटमध्ये शारापोव्हाची सुरुवात चांगली झाली नाही. दुसर्‍याच गेममध्ये तिने आपली सर्व्हिस गमावल्याने केनेपीने २-0 अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर शारापोव्हाने सलग दोन गेम जिंकून ४-२ अशी आघाडी घेतली.


Share this Story:

Follow Webdunia marathi