Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सानिया-कारा ब्लॅक जोडीला महिला दुहेरीचे विजेतेपद

सानिया-कारा ब्लॅक जोडीला महिला दुहेरीचे विजेतेपद
सिंगापूर , सोमवार, 27 ऑक्टोबर 2014 (14:34 IST)
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि झिम्बाब्वेची कारा ब्लॅक या जोडीने गतविजेत्या पेंग शुआई आणि सी सू वेई या जोडीला महिलांच्या दुहेरीत सरळ सेटमध्ये नमवून डब्ल्यूटीए किताबावर आपले नाव कोरले आहे. सानिया आणि कारा या तिसर्‍या मानांकित जोडीने ५९ मिनिटे चाललेल्या या अंतिम सामन्यात चीन आणि चीन तैपेईच्या दुसर्‍या मानांकित जोडीचा ६-१, ६-0 असा पराभव केला. भारत आणि झिम्बाब्वेच्या या जोडीने या सामन्यात आपला दबदबा कायम ठेवला होता. प्रतिस्पर्धी जोडीला केवळ एकच गेम जिंकता आला. सानिया आणि काराने पहिल्या सेटमध्ये केवळ एक गेम गमावला; पण दुसर्‍या गेममध्ये प्रतिस्पर्धी जोडीला एकही गेम जिंकू दिला नाही. सानिया आणि काराने दोन्ही सेटमध्ये तीन-तीन वेळा प्रतिस्पर्धी जोडीची सर्व्हिस भेदली. सानिया आणि कारा यांचा हा पाचवा डब्ल्यूटीए दुहेरी किताब आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi