Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सायनाने मानले सचिनचे आभार

सायनाने मानले सचिनचे आभार

वेबदुनिया

WD
‘इंडियन बॅडमिंटन लीगमधील समना बघायला आल्याबद्दल अन् बॅडमिंटन या खेळाचे समर्थन केल्याबाबत मनापासून धन्यवाद!’ अशा शब्दात शटलक्वीन सायना नेहवालने ट्विटर या सोशल नेटवर्किग साइटवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे आभार मानले.

आयबीएलमधील मुंबई मास्टर्स आणि दिल्ली स्मॅशर्स यांच्यामधील लढत पाहण्यासाठी सचिनने आपली पत्नी अंजलीसोबत वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम गाठले. याप्रसंगी सुनील गावस्कर व अजित आगरकर या स्टार क्रिकेटपटूंचीही उपस्थिती होती. गावस्कर मुंबई मास्टर्स संघाचे सहमालकही आहेत हे विशेष.

आयबीएलमधील लढत संपल्यानंतर ली चोंग वेई क्रिकेटचा कोहिनूर सचिन तेंडुलकरला भेटला यावेळी तो म्हणाला, ‘मी पहिल्यांदाच त्याला भेटलो अन् बोललो. सचिन माझा सामना बघायला आल्यामुळे प्रचंड आनंद झाला. आतापर्यंत एकदाही क्रिकेट सामना बघितला नाही पण एक ना एक दिवस क्रिकेट सामना जरूर पाहीन.’

Share this Story:

Follow Webdunia marathi