Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आजपासून आशियाई क्रीडा स्पर्धेस सुरुवात

आजपासून आशियाई क्रीडा स्पर्धेस सुरुवात
इंचेऑन , शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (12:40 IST)
दक्षिण कोरिातील इंचेऑन येथे आज (शुक्रवारी) पासून आशिाई क्रीडा स्पर्धेस प्रारंभ होत आहे. 2016च्या रिओ ऑलिम्पिकपूर्वी होणार्‍या क्रीडा स्पर्धेचे हे सर्वात मोठे आयोजन आहे. 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत ही स्पर्धा खेळली जाणार आहे. 
 
या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता होईल. 16 दिवस चालणार्‍या या स्पर्धेमध्ये 45 देशांचे 10 हजार खेळाडू भाग घेत आहेत. 36 खेळांमध्ये 439 क्रीडा प्रकार आहेत. भारत 28 खेळात प्रतिनिधित्व करणार आहे. 63 वर्षात भारताने 1951, 1982 आणि 2010 मध्ये उच्चतम कामगिरी केली आहे. 1951 साली भारताने 15 सुवर्णपदकांसह एकूण 51 पदके मिळविली. 1982 साली 13 सुवर्णपदकांसह 57 पदके मिळविली तर 2010 साली 14 सुवर्णपदकासह 65 पदके मिळविली आहेत. आशिाई स्पर्धेच इतिहासात भारताच्या नावावर 128 सुवर्णपदके असून 545 पदकासह भारत पाचव्या स्थानावर आहे. चीनचा संघ अव्वल स्थानी आहे.
 
भारताने 16 सुवर्णपदके जिंकल्यास भारत 63 वर्षाचा जुना विक्रम मोडेल. चीनने नेमबाजी, बॅडमिंटन व अँथॅलेटिक्समध्ये आपले वर्चस्व राखले आहे. चीनने 500 पदके मिळविली आहेत. दक्षिण कोरियाने तिरंदाजी, अँथॅलेटिक्स, बॉक्सिंगमध्ये आघाडी घेतली आहे. कोरियाने 350 पदके मिळविली आहेत. इराणने कुस्ती या खेळात आपला दबदबा नेहमीच ठेवला आहे. यावेळी भारताला कुस्तीमध्ये सर्वाधिक पदकांची आशा आहे. कुस्तीमध्ये भारताने मागील राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 13 पदके जिंकली आहेत. या स्पर्धेत जपान, इराण, कोरिया यांचे आव्हान असणार आहे. पुरूष हॉकीमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने रौप्पदक जिंकल्याने उत्साह वाढला आहे. यावेळी 16 वर्षानंतर भारत हॉकीत सुवर्णपदक मिळवेल, अशी आशा आहे. या स्पर्धेस पाकिस्तान व यजमान दक्षिण कोरिया यांचे हॉकीमध्ये आव्हान असणार आहे. 
 
भारताने कबड्डीमध्ये सातवेळा विजेतेपद मिळविले आहे. पाकिस्तान व बांगलादेश संघ भारताला आव्हान देऊ शकतील. भारताला 28 वर्षानी कुस्तीमध्ंस सुवर्णपदक जिंकण्याची आशा आहे. त्याचप्रमाणे 28 वर्षापासून भारताने बॅडमिंटनचे पदक जिंकलेले नाही. 1986 साली भारताने शेवटचे कांस्पदक बॅडमिंटनमध्ये मिळविले होते. पुरूष हॉकीमध्ये भारताने विजेतेपद मिळविले तर भारताचा संघ रिओ ऑलिम्पिकला पात्र ठरु शकेल. भारताचे मेरी कॉम, मनोजकुमार (बॉक्सिंग), सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, पी. कश्यप (बॅडमिंटन), सानिया मिर्झा (टेनिस), विकास गौडा (अँथॅलेटिक्स), जितू रॉय (नेमबाजी), योगेश्वर दत्त (कुस्ती) हे खेळाडू फॉर्मात असून त्यांच्याकडून पदकांची आशा आहे. भारताचे पथक हे 679 सदसंचे आहे. 
 
आशिया स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे व 19 तारखेस अधिकृतरीत्या स्पर्धेस सुरुवात होईल. आशियाई खंडातील 6 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आशियाई क्रीडा स्पर्धेची क्रीडा ज्योत (मशाल) ही या शहरामध्ये पोहोचली आहे. शुक्रवारी स्टेडियमवर या मशालीचा शेवटचा टप्पा पूर्ण होणार आहे. त्याचदिवशी स्पर्धेचे उद्घाटन होत आहे. ‘गगनम स्टाइल’ नृत्य करणारा प्रसिध्द कलाकार गायक साई आणि चीनचा पिआनो वादक लांग लांग हे आपली कला सादर करणार आहेत. चीनने सर्वाधिक 900 खेळाडूंचा संघ पाठविला आहे. आशिाई स्पर्धेतील फुटबॉल खेळाला यापूर्वीच सुरुवात झाली आहे. गतविजेत्या जपानने पुरुष गटात कुवेतला नमविले आहे. जपानला इराकविरुध्द दुसरा सामना खेळावायचा आहे. यजमान दक्षिण कोरियाच्या महिला संघाचा भारताशी सामना खेळला जाणार आहे. उत्तर कोरियाच्या महिला संघाने व्हिएतनामच्या महिला संघाचा 5-0 ने पराभव केला आहे. 
 
शहरात स्टेडियमवर व विमानतळावर बॅनर्स सोडून इतर प्रतिकृती लावण्तात आलेले नाहीत. हे शहर राजधानी सेऊलपासून 25 किमी दूर आहे. 1986 साली सेऊल येथे आशियाई स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या कोरिया तिसर्‍यावेळी आशिया स्पर्धा भरवत आहे. 2002 साली भुसान येथे स्पर्धेचे आयोजन केले होते. तिकीट विक्री ही फारशी झालेली नाही परंतु त्याला वेग येईल, अशी अपेक्षा आहे. चीनने ग्वाँगझु येथे झालेल्या पूर्वीच्या आशियाई स्पर्धेत 199 सुवर्णपदक मिळविण्याचा विक्रम केला होता. त्यांची एकूण पदकांची संख्या 416 होती. दक्षिण कोरियाने मागच्यावेळी 76 सुवर्णपदके 65 रौप्यपदके आणि 91 कांस्पदकासह दुसरे स्थान मिळवले होते. जपानसुध्दा आपले तिसरे स्थान ठेवण्याच्या प्रयत्नात राहील. 

Share this Story:

Follow Webdunia marathi