Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज ब्राझील-कोलंबिया लढत

आज ब्राझील-कोलंबिया लढत
फोर्टालेझा , शुक्रवार, 4 जुलै 2014 (12:29 IST)
शनिवारी पहाटे 1.30 वाजता.
शुक्रवारी येथे यजमान ब्राझील आणि कोलंबिया संघात विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील दुसरा उपान्त्पूर्व फेरीचा सामना खेळला जात आहे. हा सामना जिंकण्यास ब्राझीलचा संघ सज्ज झाला आहे.


ब्राझीलचा प्रमुख स्ट्राईकर नेमार याने सहावा विश्वचषक जिंकण्यासाठी आमचा संघ प्रयत्नशील आहे, असे सांगितले. ब्राझीलने यापूर्वी पाचवेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. घरच्या मैदानावर ते कोलंबियाविरुद्ध खेळत आहेत. उपान्त्पूर्व फेरी गाठेर्पत ब्राझीलने चमकदार कामगिरी केली नाही, अशी टीका याला सेलकावो यांनी केली होती. बाद फेरीत ब्राझीलला चिलीचा पराभव करण्यासाठी पेनाल्टीचा आधार घ्यावा लागला होता. ब्राझीलने ही लढत 3-2 ने जिंकली होती. तत्पूर्वी साखळी स्पर्धेत ब्राझीलने क्रोएशिाचा पराभव केला, मेक्सिकोशी बरोबरी साधली आणि कॅमेरूनचा पराभव करून बाद फेरी गाठली होती.

बियाने साखळीत ग्रीस, आव्हरी कोस्ट व जपानचा पराभव करून निर्विवाद वर्चस्वासह बाद फेरी गाठली होती. तुम्ही 4-0 अथवा 5-0 असा विजय मिळविला तरी त्याचा आनंद उपभोगू शकत नाही. सध्याचा फुटबॉल खेळ हा अत्यंत कठीण झाला आहे. आम्हाला प्रदर्शन नको आहे. आम्हाला विजयासाठी प्रयत्न करावाचा आहे, असे बार्सिलोनाकडून खेळणार्‍या ब्राझीलच्या नेमारने सांगितले.

चिलीच्या गानझालो जारा याची निर्णायक स्पॉटकिक हुकली त्यावेळी नेमारने जमिनीवर खाली बसून डोळ्यातून अश्रू काढले होते. त्याचे सहकारी जुलिओ सेसार आणि थिआगो सिल्व्हा यांनी आनंद व्यक्त केला होता. 200 दशलक्ष ब्राझीलिन हे आमच्या संघाकरिता अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रशिक्षक फेलिपे स्कॉलरी यांनी संघाला आधार दिला. पेनाल्टी किकच्यावेळी त्यांनी मानसिकतज्ज्ञाला बोलाविले. त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकलो, असेही तो म्हणाला.

कोलंबिाचा प्रमुख स्ट्राकर व गोल्डन बुटाच्या शर्यतीत असलेला व पाच गोल केलेला जेम्स रॉड्रिग्ज याला कसे थोपवावे, असा प्रश्न लुईज फेलिपे स्कॉलरी यांना पडला आहे व त्यांनी त्याला रोखण्यासाठी एक फॉर्मुला तयार केला आहे. जुनाच्या फॉर्मुला वापरण्याचा त्यांचा विचार आहे. गतवर्षी कॉनफेडरेशन कप ब्राझीलने जिंकला होता. त्यावेळी वापरण्यात आलेला फॉर्मुला यावेळी वापरण्याचा स्कॉलरीचा विचार आहे व त्यांच्यापढे सेलकावोच कोलंबियाचे आव्हान असणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi