Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आनंदचा दुसरा डावही बरोबरीत

आनंदचा दुसरा डावही बरोबरीत
, शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2015 (09:50 IST)
बिलबाव, स्पेन- विद्यमान विजेत्या विश्वनाथन आनंदला बिलबाव मास्टर्स फायनल बुद्धिबल स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीतही संघर्ष करावा लागल्याने बरोबरीतच समाधान मानवे लागले. यावेळी चीनच लिरेन डिंगने त्याला बरोबरीत रोखल्याने आनंदला संयुक्त दुसरे स्थान मिळाले आहे. सलग दोन डाव अनिर्णित राहिल्याने जेतेपद स्वत:कडेच राखण्यासाठी आनंदवरील दडपण आता वाढले आहे. या स्पर्धेच्या अजून चार फेर्‍या बाकी असून त्यापैकी तीन डावांत त्याला काळ्या मोहरांनी खेळावयास मिळणार आहे.
 
पहिल्या फेरीत अनीश गिरीविरूद्ध वरचढ स्थिती असूनही आनंदला त्याचा लाभ घेता आला नव्हता. चार खेळाडूंचा सहभाग असलेल्या दुहरी राउंड रॉबिन पद्धतीने खेळविल्या जात असलेल्या या स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीतील अमेरिकेचा वेस्ली सो व हॉलंडचा अनीश गिरी यांचा डावही ‍अनिर्णीत राहिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi