Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आनंदने अरोनियनला रोखले बरोबरीत

आनंदने अरोनियनला रोखले बरोबरीत
, सोमवार, 7 डिसेंबर 2015 (10:08 IST)
लंडन - सातव्या लंडन चेस क्‍लासिक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत माजी जगजेत्त्या विश्वनाथन आनंदने अरोनियनला बरोबरीत रोखले. तसेच दुसऱ्या फेरीत इतर सगळे डाव बरोबरीत सुटले. दुसऱ्या फेरीअखेर अनिष गिरीने आपली आघाडी कायम ठेवली आहे.
 
लंडन चेस क्‍लासिक स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सर्व डावात प्रेक्षकांना चमकदार लढत पाहायला मिळाल्या होत्या. पण दुसऱ्या फेरीत सगळे डाव बरोबरीत सुटले आणि उपस्थित बुद्धिबळ प्रेमींची निराशा झाली. सर्व लढतींमध्ये नाकामुरा आणि मॅक्सिम वॅशे-लेग्राव यांच्यातील डाव उत्कंठापूर्वक होत बरोबरीत सुटला. तर रविवारी आनंद मॅग्नस कालर्सन बरोबर झुंजेल. रविवारी होणाऱ्या या लढतीकडे सर्व बुद्धिबळ प्रेमींचे लक्ष्य लागले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi